पालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ; एकावर गुन्हा

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) – रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणारा हातगाड बाजुला करणाऱ्या नगरपरिषद कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याने एकावर गुन्हा नोंद झाला. राजवाडा बसस्थानकाशेजारी असलेल्या एका हॉटेलजवळ वाहतुकीला अडथळा होईल असा हातगाडा लावत एकजण केळी विक्री करत होता. लोकांच्या सतत तक्रारी आल्याने सातारा नगरपालीकेचे अतिक्रमण विभागातील लिपीक शैलेश अष्टेकर यांनी तो गाडा बाजुला घेण्यास सांगीतले. यावेळी चिडलेल्या रहिमान उर्फ पप्पु बागवान रा. मंगळवार पेठ, सातारा याने त्यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्याकडे असलेले पावती पुस्तक हिसकावत ते फाडुन टाकले. त्यानंतर त्याने त्याच्या हातगाड्यावरील केळी रोडवर फेकत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी अतिक्रमण विभागातील लिपीक शैलेश अष्टेकर यांनी सातारा शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)