पालिका कर्मचाऱ्याचा धरणात बुडून मृत्यू

पिंपरी – मुळशी येथील टाटा धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.27) दुपारी चारच्या सुमारास घडली. रमेश बबन हरेल (वय 40, रा.इंद्रायणी पार्क, मोशी) असे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

रमेश हरेल हे पाच महिन्यापूर्वी अनुकंपा तत्वावर महापालिकेत रुजू झाले होते. जनसंपर्क विभागात शिपाई म्हणून ते कार्यरत होते. त्यांचामागे आई-वडील, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. शनिवारी, रविवारी सुटी असल्याने महापालिकेतील काही अधिकारी, कर्मचारी फिरण्यासाठी मुळशीतील धरण परिसरात गेले होते. त्यावेळी रमेश हरेल पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)