पालिका कर्मचाऱ्यांना ‘अस्वच्छता’ भोवली

आरोग्य निरीक्षक, मुकादमांना प्रत्येकी 500 रुपयांचा दंड


नागरिकांना दंड, अधिकाऱ्यांना दिली फक्‍त समज


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बसस्थानक अस्वच्छतेकडे कानाडोळा

पुणे – पुणे स्टेशन बस स्थानकाच्या आवारात कचरा साठल्याप्रकरणी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचा आरोग्य निरीक्षक आणि मोकादमांना प्रत्येकी 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, ज्या ज्या एसटी स्थानकाच्या आवारात ही अस्वच्छता झाली आहे. स्थानक प्रमुखांना केवळ समज देण्यात आली असून या भागात स्वच्छता ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महापालिकेकडून केंद्र शासनाच्या “स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरात पुण्याला अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी शहरात नियमितपणे स्वच्छता सुरू असून अस्वच्छता पसरविणारे तसेच त्याला जबाबदार असणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत पालिकेने अस्वच्छता पसविणाऱ्या सुमारे 5 हजार जणांवर कारवाई केली आहे. हे अभियान आता अंतिम टप्प्यात असताना, महापालिका आयुक्त तसेच या अभियानाची मुख्य जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक तसेच या सर्वेक्षणाचे समंन्वयक माधव जगताप यांनी दुपारी 4 च्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात भेट दिली. यावेळी या अधिकाऱ्यांनी एस. टी. महामंडळाचे पुणे स्टेशन बस स्थानक, पुणे रेल्वे स्टेशन या परिसराची पाहणी केली. यावेळी एसटी स्थानकाच्या परिसरात मोठा कचऱ्याचा ढीग आढळून आला; तर पुणे स्टेशन परिसरातही जागोजागी कचऱ्याचे ढीग होते. मात्र, त्यासाठी कोणालाच जबाबदार न धरता या अधिकाऱ्यांनी डेपो प्रमुखांची भेट घेऊन त्यांना कचरा होऊ नये म्हणून सूचना केल्या.

शासकीय कार्यालयांवर कारवाईचा अधिकार नाही
पुणे स्टेशन बस स्थानकात मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृह तसेच आवारात कचरा आढळला असला तरी, या विभागास दंड आकारण्याचा अधिकार नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या बसस्थानकाच्या आवारातील कचरा महापालिकेकडून उचलला जातो. त्यामुळे हा कचरा वेळेत उचलण्यास दिरंगाई करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले. मात्र, पुणे स्टेशन आणि एसटी बसस्थानक स्वच्छ राहावे यासाठी या दोन्ही विभागांना पत्र देण्यात आले असून त्यांना स्वच्छतेबाबत सूचना केल्याचे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)