पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

सणासाठी उचल निधीची मर्यादा वाढविल

पुणे – महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. पालिकेच्या सुमारे 18 हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा सणासाठी दिल्या जाणाऱ्या उचल निधीची रक्कम 8 हजार वरून 10 हजार रुपये करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याबाबतचे आदेश नुकतेच काढल्याची माहिती पालिकेच्या मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांनी दिली. या प्रस्ताव मागील महिन्यात झालेल्या मुख्यसभेत मान्यता देण्यात आलेली आहे.

-Ads-

महापालिकेतील अधिकारी व सेवकांना वर्षातून एकदा याप्रमाणे प्रत्येकी 8 हजार रुपये इतकी रक्कम सणासाठी उचल आदा करण्यात येते. त्यात वाढ करून सर्व कर्मचाऱ्यांना सणासाठी उचल म्हणून प्रचलित कार्यपद्धतीनुसार आता सरसकट 10 हजार रु. प्रतिवर्षी अदा करण्यात येणार आहे.

दहा समान मासिक व्याजरहित हप्त्यांमध्ये वसुली करणे मान्यता देण्यात आली आहे. तसेच सणासाठी उचल यासाठी प्रचलित अटी, तपशिल, कार्यप्रणाली यामध्ये बदल करण्यात आलेला नाही. त्यानुसार ही रक्कम या महिन्यापासून देण्यात येणार असल्याचे कळसकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महापालिका कर्मचारी दरवर्षी दिवाळीमध्येच या रकमेची उचल घेत असल्याचेही कळसकर म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)