पालिका अधिकाऱ्यांचेही ‘स्कूल चले हम’

प्रातिनिधीक छायाचित्र

शाळा पालकत्वाच्या प्रस्तावास अखेर आयुक्तांची मान्यता

पुणे – महापालिका शाळांच्या सद्यस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी अखेर आयुक्तांनी सुमारे 140 अधिकारी आणि अधिकाऱ्यांवर शाळा पालकत्वाची जबाबदारी निश्‍चित केली आहे. या अधिकाऱ्यांनी या शाळेना भेटी देऊन त्यांचा सद्यस्थिती अहवाल शिक्षण विभागास द्यायचा आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने “स्कूल चले हम’ हा व्हॉटस्‌ ऍप ग्रूप तयार केला असून त्यावर हे अहवाल द्यायचे आहेत.

287 – पालिकेच्या शाळा


1 लाख – एकूण विद्यार्थी संख्या


139 – अधिकाऱ्यांची नावे निश्‍चित

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात महापालिकेच्या 287 शाळा असून 1 लाख विद्यार्थी आहेत. मात्र, शाळांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरसोयी आहेत. या ठिकाणच्या व्यवस्थापनासाठी प्रशासकीय यंत्रणा असली, तरी त्यांच्याकडून त्या सुविधा वेळेवर दिल्या जातात, असे नाही. तसेच शाळा आणि रुग्णालयांना आवश्‍यक सुविधा देण्यात आल्या आहेत का? याची तपासणी करणारी कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नाही. ही बाब लक्षात घेऊन आयुक्‍तांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना आपल्या निवासस्थानाजवळील शाळांचे पालकत्त्व घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, दिवसातून वेळ काढून एकदा या ठिकाणी अधिकाऱ्यांनी जावे, तसेच सोयी-सुविधांची पाहणी करावी. तसेच, काही सोयी-सुविधा अथवा प्रशासकीय यंत्रणा अपूर्ण असल्यास त्याची माहिती आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागास व्हॉट्‌स ऍपद्वारे कळविण्यात यावे, असे आयुक्‍तांनी आवाहन केले होते.

आयुक्‍तांच्या सूचनेनुसार शिक्षण विभागाने थेट आदेश काढून अधिकाऱ्यांवर पालकत्त्वाची जबाबदारी दिली. त्यासाठी सुमारे 139 अधिकाऱ्यांची नावे निश्‍चित करण्यात आली. मात्र, अनेक अधिकाऱ्यांनी कारणे सांगत शाळा बदलण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, शिक्षण विभागाने पुन्हा एकदा शाळांच्या पालकत्वाची सुधारीत यादी तयार करून पालिका आयुक्‍तांच्या मान्यतेसाठी ठेवला होता. अखेर आयुक्तांनी त्यास मान्यता दिली असून नवीन वर्षात हा पालकत्वाचा उपक्रम सुरू होणार आहे.

या बाबींची होणार तपासणी
महापालिका आयुक्तांनी नियुक्त केलेल्या या अधिकाऱ्यांमध्ये उपायुक्तांपासून शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षपकांचाही समावेश आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार, या अधिकाऱ्यांना 15 दिवसांतून एकदा या निश्‍चित करून दिलेल्या शाळांना भेट द्यायची आहे. या भेटीत या अधिकाऱ्यांनी शाळेच्या इमारतीमधील भौतिक सुविधा, (उदा. पाणी, विद्युत व्यवस्था, स्वच्छतागृह, साफसफाई) तसेच शाळेतील शिक्षक, कर्मचारी तसेच मुलांच्या उपस्थितीबाबतही तपासणी करायची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)