पालापाचोळा व सांडपाण्यावर वीज निर्मिती प्रकल्प उभाणार – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – गावा-गावातील पिकांचे वेस्ट, पालापाचोळा, अन्य कचरा तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करुन वीज निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचा मनोदय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेज येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. समारंभास संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील, डॉ. जे.बी. पाटील, डॉ. एम. एम. पवार, प्रकाश हिलगे, सचिन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील वेस्टेजपासून वीज निर्मिती करणे आता शक्य असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गावागावातून पिकांचे राहिलेले देठ,पालापाचोळा अशा घन कचऱ्याबरोबरच गोमुत्र, मलमुत्र तसेच सांडपाणी यावर प्रक्रिया करुन वीज निर्मितीचा प्रकल्प जिल्हयात उभारण्याचा प्रयत्न राहील. पर्यावरण संतुलनासाठी आणि वीज बचतीसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पर्यावरण संतुलन आणि संवर्धनासाठी ताराराणी विद्यापीठाने हाती घेतलेला सौर ऊर्जा प्रकल्प उपयुक्त असल्याचे सांगून पाटील म्हणाले, ताराराणी विद्यापीठाने   मुलींच्या शिक्षणात भरीव काम केले असून महिला सक्षमीकरणासाठी संस्थेचे विविध उपक्रम उपयुक्त आहेत.संस्थेच्या विविध विकास उपक्रमांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.संस्थेचे कार्यध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्तावित केले . प्राचार्य डॉ. जे.बी. पाटील यांनी आभार मानले. समारंभास शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थींनी उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)