पालघर लोकसभा पोटनिवडणूक, मतमोजणीला सुरुवात

पालघर – लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजप, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

28 मे रोजी पालघरमध्ये लोकसभेसाठी पोटनिवडणूक होऊन सात उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त झाले होते. या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून कॉंग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, कॉंग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)