पालघर आणि गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

मुंबई – पालघर आणि गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली असून, त्याचसोबत सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभेचीही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी 28 मे रोजी मतदान तर 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपशी बंडखोरी करत राजीनामा दिल्याने गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. तर दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांनी 2014 च्या पालघर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारली होती. वनगा यांचा कार्यकाळ संपायला 15 महिन्यांचा कालावधी उरला असताना त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. तसेच काँग्रेसचे ज्येष्‍ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात देखिल पोटनिवडणूक होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)