पालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के 

पालघर – पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्‍यात आज पुन्हा भूकंपाचे धक्के बसले आहेत. हा भूकंपाची नोंद 3.3 रिश्‍टर स्केल झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमा भागातील गावांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहे. भूकंपाचे धक्‍के जाणवताच नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून धुंदलवाडी भागातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्‍यातील धुंदलवाडी, चिंचले, हळदपाडा, दपचारी, सांसवंद, आंबोली, वरखंडा, वकास तर तलासरी तालुक्‍यातील तलासरी, वडवली, कवाडा, सवणे, कुर्झे, वसा, कारजगाव गावात मागील महिन्यात गूढ आवाज होऊन जमीनीला हादरा बसत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी 3 नोव्हेंबर रोजी गूढ आवाजाने हा परिसर हादरला होता.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)