पालघरमध्ये तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

पालघर – येथील आगवनमध्ये तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैंवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खुशबू माच्छी आणि सुरक्षा माच्छी अशी मृत बहिणींची नावे आहेत. दोन्ही मुलींच्या दुर्दैवी मृत्यूने माच्छी कुटुंबीयांवर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बुधवारी दुपारी तलावात आंघोळीला गेले असता पाय घसरल्याने त्या पाण्यात बुडाल्या. त्यावेळी स्थानिकांनी तात्काळ या दोन्ही बहिणींना पाण्यातून बाहेर काढून त्यांना तात्काळ पालघरमधील ढवळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी दोन्ही मुलींना मृत घोषित केले. मात्र, त्यानंतर येथील हॉस्पिटल प्रशासनाने पुढील कोणतीही प्रशासकीय कार्यवाही न करताच मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. नातेवाइकांनी मृतदेह घरी नेऊन अंतिम संस्कार आटोपले.

-Ads-

या दोघीही जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनी असल्याने सदर बाब संबंधित रुग्णालय प्रशासनाने स्थानिक पोलीस आणि यंत्रणेला कळवणे आवश्‍यक होते. त्यामुळे याप्रकरणी रुग्णालयाचा हलगर्जीपणाही समोर आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)