पालघर : भाजपा आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे राजेंद्र गावित यांनी विजय मिळवला आहे. भाजपाच्या या विजयात, शेवटच्या क्षणी एका गोष्टीनं निर्णायक भूमिका बजावल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ‘साम-दाम-दंड-भेद’च्या क्लीपनं खळबळ उडवून दिली होती आणि जणू त्या क्लीपभोवतीच निवडणूक फिरली होती. त्या क्लीपमुळे मुख्यमंत्री अडचणीत येतील, भाजपाला फटका बसेल, असं सुरुवातीला वाटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेलाही तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, अत्यंत चतुराईने देवेंद्र फडणवीस यांनी त्याच ऑडिओ क्लीपच्या आधारे वातावरण फिरवलं आणि पालघर ‘जिंकून दाखवलं’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)