ठाणे : पालघर पोटनिवडणुकीत चिंतामण वनगा यांच्या मुलाला उमेदवारी देऊन शिवसेनेने कुरघोडी केली. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली आहे. त्यामुळे आगामी प्रचारात दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आगपाखड करणार, यात कोणतीही शंका नाही. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खासदार नारायण राणे यांना प्रचारात उतरण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे राणे यांनीही मुख्यमंत्र्यांची ही विनंती मान्य केली आहे.
भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. वनगा यांच्या कुटुंबानं गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला. चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्याने भाजपासमोरील अडचणी वाढल्या होत्या.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0