पालखेडवरील बंधारेप्रत्येक आवर्तनात भरुन मिळावे : भवर

कोपरगाव – तालुक्‍यातील करंजी तेउक्कडगाव दरम्यान पालखेड डाव्या कालव्यावरील विविध बंधारेप्रत्येक आवर्तन काळात भरुन मिळावेत, अशी मागणी जिल्हा परिषद माजी गटनेतेकेशव भवर यांनी केली.
भवर म्हणाले, पूर्व भागातील दुष्काळी भागात करंजी ते उक्कडगाव दरम्यान विविध पाझर तलाव आहेत. येथेसातत्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. यामुळे उन्हाळ्यात येथेटॅंकर सुरु करावेलागतात. टॅंकरवर मोठ्या प्रमाणात होणारा खर्च वाचण्यासाठी करंजी तेउक्कडगाव दरम्यानच्या बंधा-यात पालखेडचे पाणी आवर्तन काळात सोडावे. तेभरून दिल्यास पाणीटंचाई दूर होते. परंतु यासाठी प्रत्येकवेळेस पालखेड पाटबंधारे कार्यालयाचे अधिकारी व विभागीय आयुक्‍त (नाशिक), जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करावी लागते. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण दरवर्षी होण्यास उशीर होतो. त्यामुळे या भागातील जनावरांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण तयार होते. कायमस्वरूपी पालखेडचेपाणी आरक्षित झालेतर त्याचा प्रत्येक आवर्तन काळात त्रास जाणवणार नाही, याकडेभवर यांनी लक्ष वेधले. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पाटबंधारे विभागाकडे त्याबाबतचा पाठपुरावा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)