पालखी सोहळ्यासाठी भिसे प्रतिष्ठानचा फिरता दवाखाना

जळोची – बारामती येथील कै.रामचंद्र भिसे (गुरुजी) वैद्यकिय प्रतिष्ठानच्या वतीने जनसेवा हिच ईश्‍वरसेवा या उद्देशाने काम सुरू आहे. याच उद्देशाने प्रेरीत देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर आषाढी वारीत संत तुकाराम महाराज 333 व्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी श्रीमती सोनियाजी राजीवजी गांधी फिरता मोफत दखाखाना ही सुविद्या उपलब्ध करुन दिली जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय भिसे यांनी दिली आहे. संत तुकाराम महाराज पालखीचे दि.5 जुलै रोजी देहूतून प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येणार असून यावर्षी रुग्णवाहिका सेवाही पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालखी मार्गावर मोफत तपासणी व औषधोपचार करणाऱ्यां संस्थांना ही औषधांची मदत केली जाणार आहे. या उपक्रमातील पथकात डॉ. अप्पा आटोळे व डॉ. योगेश पाटील (लासुर्णे), राजेंद्र गायकवाड हे मदतनीस सहभागी होणार आहेत, अशी माहिती डॉ. भिसे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)