पालखीत सहभागी होणाऱ्या वाहनांची तपासणी

पुणे – संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये प्रवासी तसेच जड वाहने सहभागी होत असतात. सदर वाहनांतील तांत्रिक दोषांमुळे अपघात होऊ नयेत, वाहने रस्त्यात बंद पडू नये. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

दि. 26 जून ते 4 जुलै या कालावधीत कार्यालयीन वेळेत प्रादेशिक परिवहन पुणे कार्यालयाचे आळंदी रोड चाचणी मैदान व दिवे येथील टेस्ट ट्रॅक तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांचे मोशी येथील कार्यालयात वाहनांची तांत्रिक तपासणी करण्यात येईल. वाहन तपासणीवेळी वाहनाची सर्व कागदपत्रे जसे नोंदणी, कर, विमा, योग्यता व प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र, लायसन्स व वाहतूक परवाना मुदतीत असणे आवश्‍यक आहे. सदर तपासणी विनामूल्य करून प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ प्रशानसाकडून देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)