पालक-विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग

  • अकरावी प्रवेश : गोंधळ टाळण्यासाठी प्रवेश नियंत्रण समितीच्या सूचना

पिंपरी, (प्रतिनिधी) – अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ टाळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते. पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी असे चार विभागनिहाय मिळून आकुर्डीतील म्हाळसाकांत विद्यालयात दि.15 जूनला दुपारी 11 ते 12 व तीन ते चार अशा दोन वेळांमध्ये अकरावी प्रवेशासाठी मार्गदर्शन वर्ग भरले होते.

अकरावी ऑनलाइन केंद्रिय प्रवेश प्रक्रियेसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सर्व उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाची ऑनलाइन प्रवेश सुरू झाले आहेत. सदर प्रवेश प्रक्रियेच्या माहितीसाठी पुस्तिका वितरण करण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचप्रकारे प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी विभागनिहाय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेची माहिती जाणून घेण्याठी बऱ्याच पालक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात हजेरी लावली होती.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेवेळी अर्जाचा भाग एक व भाग दोन कसा भरावा तसेच आरक्षाणाच्या प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे वापरावीत, प्रवेशासाठी संमती कशाप्रकारे दिली जाणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती या मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून दिली गेली. अकरावीसाठी मार्गदर्शनपर पुणे सूचना सहायक शिक्षण संचालक मिनाक्षी राउत यांनी दिल्या होत्या.

या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रवण हार्डिकर, जयहिंद हायस्कूलचे उपप्रचार्य के . सी. सोनवणे, सहायक शिक्षण अधिकारी भाउसाहेब कारेकर तसेच काही महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)