पालकांनी शिकण्याचा ‘धडा’

‘प्यार के साइड इफेक्‍ट्‌स’ आणि ‘शादी के साइड इफेक्‍ट्‌स’ या सारखे चित्रपट दिलेल्या दिग्दर्शक साकेत चौधरीने एका वेगळ्या विषयाला हात घातला आहे. प्यार आणि शादी नंतर येतो मुलांच्या शिक्षणाचा विषय, भारतात नेहमीच इंग्रजी भाषेला इतर कोणत्याही भाषेपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. मुलांना त्यांचे पालकही इंग्लिश मीडियममध्ये शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करतात. शिक्षणाच्या बाजारीकरणावर नेमक भाष्य “हिंदी मिडीयम’ मध्ये करण्यात आले आहे.
“हिंदी मीडियम’ ही कथा आहे राज बत्रा (इरफान खान) आणि मीता (सबा कमर) या विवाहीत जोडप्याची आहे. दिल्लीच्या चांदनी चौकमध्ये त्यांचे कपड्यांचे दुकान आहे. राजकडे पैसा आहे पण त्याला इंग्रजीचे ज्ञान नाही. यासाठी त्याची पत्नी मीता त्याला सतत टोमने मारत असते, त्यांची मुलगी पिया ला इंग्लिश मीडीयमच्याच शाळेत प्रवेश मिळायला हवा हा तिचा अट्टाहास आहे. त्यासाठी ते चांदनी चौकमधून वसंत विहार भागामध्ये शिफ्ट होतात. इंग्रजी मीडियम शाळांच्या नियमानुसार ऍडमिशनवेळी मुलांच्या पालकांच्याही मुलाखती होतात, मात्र अनेक तऱ्हेने प्रयत्न करूनही पियाला ऍडमिशन मिळत नाही. या नैराश्‍यातुन पुढे काय काय घडते हे सिल्वरस्क्रिनवर पहाणेच उत्तम.
“हिंदी मिडीयम’ चित्रपटाची कहाणी प्रेक्षकांना धरून ठेवते, याचे कारण असे की या सिनेमाच्या कथेशी प्रेक्षक स्वत:ला जोडून घेताना दिसतात, ही एक साधी सरळ कथा आहे. सिनेमात ड्रामा आहे, कॉमेडी आहे, विशेष करुन संवाद कमाल आहेत. साकेतने चित्रपटाचे दिग्दर्शन खूपच उत्तम केले आहे, तसेच रिअल लोकेशनवर शूटिंग केल्याने त्याची मजा अजून वाढली आहे. सिनेमॅटोग्राफी आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या शॉटसमुळे सिनेमाचे पडयावरील सादरीकण उत्तम झाले आहे.
अभिनेता इरफान खान या भूमिकेसाठी एकदम परफेक्‍ट बसतो. त्याचा अभिनय, त्याचा वावर, त्याची डायलॉग डिलीवरी, बॉडी लॅन्ग्वेज या सगळ्याच गोष्टींसाठी त्याला शंभर टक्के गुण द्यायला हरकत नाही. पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरचा अभिनयही छान झालाय. तिच्या व्यक्तिरेखेला तिने पुर्णपणे न्याय दिला आहे, तीचा हा पहिला चित्रपट आहे असे सांगीतले तर खरे वाटणार नाही. दीपक डोबरीयालचा सहजसुंदर अभिनयही आपल्याला नक्कीच आवडेल. “हिंदी मिडीयम’चे संगीत सचिन-जिगर या जोडीने उत्तम दिले आहे, तर अमर मोहिलेने बॅकग्राउंड स्कोर दिले आहे. एकंदरीत सांगायचे तर शिक्षणाच्या बाजारीकरणावर सडेतोड भाष्य करणारा हा सिनेमा पालकांना “धडा’ देणारा आहे.

चित्रपट – हिंदी मीडियम
निर्मिती – टी सीरीज, माड्डोक फिल्म्स
दिग्दर्शक – साकेत चौधरी
संगीत – सचिन- जिगर
कलाकार – इरफ़ान खान, सबा कमर, दीपक डोबरियाल, दिशिता सहगल, जसपाल शर्मा, देवांश शर्मा
रेटींग – 3.5

– भूपाल पंडित
pbhupal358@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)