पालकांनी वेळीच दक्षाता घेणे गरजेचे -भोईटे

भवानीनगर- शाळेत शिक्षण घेत असताना मुला-मुलींमध्ये समज आलेली नसते. निसर्ग नियमाप्रमाणे मुला-मुलींमध्ये बदल होत असतात. त्यावेळी आपली मुले चुकीचे पाऊल उचलणार नाहीत याची दक्षता पालकांनी वेळीच घेणे गरजेचे आहे, असे मत बारामती निर्भया पथकाच्या पोलीस नाईक अमृता भोईटे यांनी केले. बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्भया पथकामार्फत मएसो विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी अमृता भोईटे बोलत होत्या. या मेळाव्यात 400 ते 500 माता-पिता उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये पालकांना वयात येणाऱ्या मुलांमध्ये होणारे बदल, त्यांच्याशी आपला होणारा संवाद, त्यांच्याशी असणारे आपले संबंध मैत्रीपूर्ण असावेत, त्याचप्रमाणे आपल्या मुला-मुलींचे मित्र-मैत्रीण कशा असाव्यात. आपल्या घरातील वातावरण, मुलींची सुरक्षितता आदींबाबींकडे पालकांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. तसेच मुली व महिला सुरक्षित असणे व त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलीस घेत आहेत त्याच प्रमाणे बारामती निर्भया पथक कसे कार्यरत राहून काम करीत आहे याचीही माहिती भोईटे यांनी दिली. यावेळी अनेक पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तरे भोईटे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)