पालकांनी बौद्धिक विकासाकडे लक्ष द्यावे

  • गोपिचंद कदम : शिक्रापुरातील तक्षशिला येथे पालक मार्गदर्शन मेळावा

शिक्रापूर, दि.31 (वार्ताहर) – पूर्वीची शिक्षणपद्धती आदर्शवत होती. परंतु आजमितीस शिक्षणाचे व्यवसायिकरण झालेले असून इंटरनेट माध्यमाचा अतिरेक वापर होत आहे. तर शिक्षकांबरोबर पालकांची जबाबदारी वाढली असून पालकांनी पाल्याच्या भौतिक विकासापेक्षा बौद्धिक विकासाकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी केले.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तक्षशिला गुरुकुल पब्लिक स्कूल यांच्या वतीने पालक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी कदम बोलत होते यावेळी उपस्थित पालकांनी देखील विविध प्रश्न विचारत त्यांच्या शंकेचे निरासण केले. तर यावेळी प्रा. रामदास थिटे म्हणाले, पालकांनी आपल्या मुलांशी सुसंवाद साधावा आणि शिक्षण या संस्काररुपी ध्वजाची उभारणी मुलांच्या लहानपणापासून करावी. सुट्टी कालावधीचा वापर नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी करावीत.
याप्रसंगी प्रा. रामदास थिटे, संस्थेचे अध्यक्ष कृष्णाजी विरोळे पाटील, संचालिका चंद्रकला विरोळे, प्रा. सागर काकडे, माधुरी जाधव, निलेश उबाळे, रंगनाथ जाधव, अविनाश कामठे, बबन डोंगरे यांसह आदी मान्यवर, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संभाजी काळे यांनी केले तर प्रा.अविनाश कामठे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)