पालकमंत्र्यांनी पुणेकरांची फसवणूक केली

पाणीकपतीच्या निषेधार्थ महापौर मुक्‍ता टिळक यांना दिला प्रतिकात्मक टॅंकर भेट

पुणे – कालवा समितीच्या बैठकीत महापालिकेला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या पाण्यात कपात करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री यांनी पुणेकरांच्या पाण्यात कोणतेही कपात केली जाणार नाही असे जाहीर केले. मात्र, त्यानंतर आता ऐन दिवाळीत महापालिकेतील सत्ताधारी भाजपने पुणेकरांवर पाणीकपात लादली आहे. त्यामुळे पालकमंत्री गिरिश बापट यांनी पुणेकरांची फसवणूक केली असल्याची टिका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेने जाहीर केलेल्या पाणीकपातीच्या निषेधार्थ कॉंग्रेशिष्टमंडळाने महापौर मुक्ता टिळक यांना प्रतिकात्मक पाण्याचा टॅंकर भेट दिली. त्यानंतर जोशी यांनी पाणी कपातीवरून भाजपवर जोरदार टिका केली. नगरसेवक अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, नगरसेविका लता राजगुरू, सदानंद शेट्टी यावेळी उपस्थित होते.

जोशी म्हणाले की, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात सुमारे 26 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. अशा स्थितीत ऐन दिवाळीत धरणे भरली असतानाही महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. या आधी सत्ताधारी भाजपनेच दिवाळीनंतर पाणी कपात केली जाईल, असे जाहीर केले आणि आता अचानक दिवाळीपूर्वीच पाणी कपात लागू करून नागरिकांना झटका दिला आहे. त्यामुळे दिवाळीचा सण लक्षात घेऊन कपातीचे नियोजन दिवाळीनंतर करावे, अशी मागणी जोशी यांनी केली आहे.

तर, सणासुदीत घागर मोर्चा काढणार
दरम्यान, महापालिकेकडून येत्या सोमवारपासून पाणी कपात सुरू करण्यात आल्यास ऐन दिवाळीत भाजपच्या सर्व आमदार तसेच खासदारांच्या घरांसह पालिका पदाधिकाऱ्यांच्या घरावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी जोशी यांनी दिला. कालवा समितीच्या बैठकीत शहराच्या आमदार तसेच खासदारांनी आपली भूमिका मांडणे गरजेचे होते. मात्र, पुण्यासाठीची बैठक अवघ्या 5 मिनितात संपविण्यात आली. त्यामुळे आमदारांना पुणेकरांशी काही देणं-घेणं नसल्याची टिका यावेळी जोशी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)