पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती होणार स्थापन

पुणे- शासनाने जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांच्या कामांना मंजुरी देण्यासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी, दोन आमदार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा या समितीमध्ये समावेश आहे. त्यानुसार या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार या समितीकडे आले आहेत.

जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असले तरी सध्यस्थितीत या रस्त्यांवर प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबविल्या जात असून या दोन्ही योजनांची अंमलबजावणी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत केले जाते.

-Ads-

तसेच याच रस्त्यांवर जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतही काम केले जाते. या सर्वांमध्ये समन्वय असावा, या हेतूने ग्रामविकास विभागाने पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही समिती प्राधान्यक्रमाने रस्त्यांच्या कामांना मंजुरी देणार आहे. तसेच या कामासाठी संबंधित विभागाकडे निधी उपलब्ध करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर राहणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)