पालकमंत्री, आ.कर्डिलेंच्या तालावरच झेडपी चालते

शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांचा आरोप । मागण्यांसाठी सीईओंच्या दालनात ठिय्या

नगर: नगर तालुक्‍यातील इमामपूर ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहार प्रकरणी जबाबदार ठरलेल्या सरपंच, ग्रामसेवक, शाखा अभियंत्यावरील कारवाई मागे घेण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी इमामपूरच्या ग्रामस्थांसह शिवसेना व कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांनी आज मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांच्या दालनात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या तालावर जिल्हा परिषद चालत असल्याचा आरोप शिवसेनेच्या सदस्यांनी केला. भाजप पालकमंत्री, आ. कर्डिलेंच्या दबावाखाली सीईओंसह अधिकारी काम करीत असल्याने जिल्हा परिषदेचे 73 सदस्य मोडीत निघाले असल्याचा आरोप सदस्य अनिल कराळे यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर तालुक्‍यातील इमामपूर ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगातून पाण्याची टाकी व पाईलपाईनचे काम केले. यात अनियमिता झाल्याचा आरोप झाल्याने चौकशी करण्यात आली. या चौकशीत पाण्याची टाकी यापूर्वी करण्यात आली होती. ती टाकी दाखवून बिल काढण्यात आल्याचे तसेच पाईपलाईन काम देखील मुल्यांकनात कमी असल्याचे आढळून आल्याने ग्रामसेवकाला यापूर्वीच निलंबित करण्यात आले. तर सरपंच, शाखा अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. त्याला विरोध करण्यासाठी आज इमामपूर ग्रामस्थांसह शिवसेनेच्या सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी नगर तालुक्‍यातील आ. कर्डिले यांच्या ताब्यात असलेल्या जेऊर, केकताई, दरेवाडी, निबंळक, नागरदेवळे या ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहार निष्पन्न झाला असून त्यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. या ग्रामपंचायतींवर कारवाई करा मग इमामपूरची कारवाई करा असा आग्रह नगर तालुका पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांनी धरला.

नगर व पाथर्डी तालुक्‍यातील कामांना खो घालण्यात येत आहे. आ. कर्डिले व आमदार मोनिका राजळे या भाजपच्या आमदारांच्या सुचनेनुसार जिल्हा परिषदेचे अधिकारी काम करीत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांच्या कामांना महत्व दिले जात नाही. पालकमंत्री व आ. कर्डिले यांच्या दबावाखाली अधिकारी काम करीत असल्याने सदस्यांवर अन्याय होत आहे. हे चालू देणार नाही. या प्रश्‍नांसाठी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घ्या असा आग्रह कराळे यांनी धरला. यावेळी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे यांनी या सदस्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतू सदस्य ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते. त्यामुळे तब्बल तीन तास ग्रामस्था व सदस्यांनी ठिय्या आंदोलन केले.

अखेर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी इमामपूरच्या कामांची फेरचौकशी करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. हे आंदोलन मागे घेण्यानंतरही कराळे, संदेश कार्ले, शरद झोडगे, बाळासाहेब हराळ, रामदास भोर यांनी ठिय्या आंदोलन चालू ठेवले. करंजी येथील मंगल कार्यालय भाड्याने देण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली. त्याला शासनाची परवानगी द्यावी लागणार असल्याचे मत माने यांनी मांडले. परंतू आता जिल्हा परिषदेने परवानगी द्यावी नंतर शासनाची परवानगी द्या असा आग्रह कराळे यांनी धरला. अखेर माने व अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)