पुणे – राज्यात सध्या तापमानात वाढ होत असून अनेक ठिकाणचे तापमान चाळीस अंशाच्या आसपास पोहोचले आहे. पुण्यात देखील गुरुवारी तापमान 38 अंश सेल्सिअस नोंदिवले गेले. त्यामुळे दुपारच्या काळात उन्हाचे तीव्र चटके जाणवत असल्याने शक्यतो घराबाहेर पडणे सध्या टाळले जात आहे.
गेल्या आठवड्यात राज्यात विविध भागांत झालेल्या वादळी पावसानंतर आता पुन्हा हवामान कोरडे झाले आहे. त्यामुळे उन्हाचे चटके वाढू लागले आहेत. गुरुवारी राज्यात सर्वाधिक तापमान हे चंद्रपुरमध्ये 40.8 अंश सेल्सिअस नोंदवल्या गेले. देशात ज्या दहा शहरांमध्ये तापमान जास्त होते त्यात चंद्रपूर आणि जळगाव यांचा समावेश आहे. राज्यात ही तापमानाची स्थिती आणखी तिव्र होणार असल्याचे हवामान खात्याच्यावतीने सांगण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. त्याचबरोबर आगामी दोन दिवसांत राज्यात तापमानाचा पारा पुन्हा वाढणार आहे.
राज्यातील इतर शहरातील तापमान पुढील प्रमाणे (अंश सेल्सिअस मध्ये) : कोल्हापूर 36.7,मालेगाव 40.4, नाशिक 37.5,सांगली 37.4,सोलापूर 38.4 अकोला 39.4, अमरावती 37.6,अहमदनगर 39.0
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा