पार्सलने बॉम्ब पाठविणाऱ्याला ट्रम्प यांचा पाठिंबा?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कथित ‘कट्टर समर्थकाने’ ट्रम्प यांच्यावर टीका करणाऱ्या १२ लोकांना पार्सल द्वारे स्फोटके पाठवल्याची घटना ताजी असतानाच ट्रम्प यांच्या एका सभेमध्ये उपस्थितांद्वारे ‘सीएनएन सक्स’चा नारा देण्यात आल्याने नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. या घटनेमुळे पार्सलने बॉम्ब पाठविणाऱ्या सेसार साओक या व्यक्तीस अथवा अशा प्रवृत्तीस खुद्द राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हेच खतपाणी घालत आहेत काय? असा प्रश्न अमेरिकन प्रसार माध्यमांमध्ये चर्चिला जात आहे.

या घटनेबाबत डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार सेसार साओक नामक ५६ वर्षीय व्यक्तीला शुक्रवारी ट्रम्प यांच्या विरोधकांना पार्सलद्वारे बॉम्ब पाठविल्याची आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पोलिसांना सदर इसमाच्या गाडीवर ‘सीएनएन सक्स’ असे घोषवाक्य लिहिण्यात आल्याचे आढळले होते. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार्लोट येथील सभेमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांवर मुक्तफळे उधळल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या जनसमुदायाने त्वेषाने बॉम्ब पाठवणाऱ्या सेसार साओकशी संबंधित असलेला ‘सीएनएन सक्स’ हा नारा बुलंद केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान जमाल खशोगी या सौदी अरब पत्रकाराच्या हत्येनंतर आकांडतांडव करणाऱ्या ट्रम्प यांच्याच सभेत ‘सीएनएन’ या प्रसिद्ध अमेरिकन वृत्तवाहिनीला पार्सलद्वारे स्फोटके पाठवणाऱ्याच्या नाऱ्याची गर्जना झाल्याने ट्रम्प यांच्यावर दुट्टपीपणाचे आरोप होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)