पार्श्‍वगायक मोहंम्मद अझिज यांचे निधन 

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम पार्श्‍वगायक मोहम्मद अझिझ यांचे आज निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. अझिझ यांना मंगळवारी दुपारी नानावटी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाले होते. अझिझ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच त्याबाबत काही ठोस माहिती देता येऊ शकेल, असे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. मात्र अझिझ यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्‍याने झाला असल्याचा दावा प्रसार माध्यमांनी केला आहे. अझिझ यांनी अमिताभ बच्चन, गोविंदा, मिथुन चक्रवर्ती आणि ऋषी कपूर यांच्यासाठी पार्श्‍वगायन केले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सुमारे 20 हजार गाणी गायली. बॉलिवूडशिवाय बंगाली आणि उडिया भाषेतील चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्‍वगायन केले होते. भजन आणि सुफी संगीताच्या कॅसेटसाठी त्यांनी गायन केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)