पार्टीचा आनंद लुटा; पण सांभाळून…

पार्टीचा मोसम आपल्यासोबत डू’ज आणि डोन्ट’स म्हणून सर्वसाधारणपणे ओळखली जाणारी वर्तणुकीची काही पथ्येदेखील घेऊन येत असतो. आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये तसेच जाडी वाढू नये यासाठी आपल्यापैकी अनेकजण खाद्यपदार्थ आणि मद्य सेवनापासून स्वतःला कटाक्षाने दूर ठेवण्याची शिकस्त करतात. त्यामुळे चयापचय अर्थात अन्नपचनाच्या यंत्रणेची उलथापालथ होते, ज्यायोगे वजन कमी जास्त होणे, हाता पायात गोळे येणे, थकवा, निरुत्साह, गलथानपणा, खराब मनःस्थिती, पित्त खवळणे आणि अस्वस्थ झोप आदी समस्या उद्‌भवतात. तथापि, पार्टीचा मोसम यशस्वीपणे साजरा करता यावा यासाठी पूर्व खबरदारी अर्थात प्रिटॉक्‍स’चे विचारपूर्वक आरेखन करण्यात आले आहे. तुमच्या शरीराला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी आणि अतिशय उत्साही व ताजातवान्या मूडमध्ये नव्या वर्षाला सामोरे जाण्यासाठी पूर्व खबरदारी अर्थात प्रीटॉक्‍स’ सहाय्यभूत ठरणार आहे. पण त्यासाठी अगदी आजपासूनच तुम्ही काही गोष्टींचा अवलंब करायला हवा, ज्यायोगे या मोसमात तुमची प्रतिकारशक्‍ती सर्वोत्तम राहील. यशस्वी प्रीटॉक्‍स’चे तीन अविभाज्य भाग आहेत; चांगला आहार आणि पाणी, पुरेसा व्यायाम आणि पुरेशी झोप. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे:

पाणी आणि लिंबू

गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून रोज सकाळी उपाशीपोटी प्या. शरीराला चटकन अल्कली मिळवून देण्यासाठी तसेच प्रक्रिया केलेले आणि मेदयुक्‍त पदार्थ, अतिसाखरयुक्‍त आणि कॅफेनयुक्‍त पेय यांमुळे शरीरात तयार झालेले अतिरिक्‍त आम्ल समतोल करण्याचा हा सर्वात जलद उपाय आहे.

जलद मॉर्निंग वॉक

जेव्हा-जेव्हा शक्‍य असेल सकाळी लवकर उठून जलद चालायला बाहेर पडा किंवा जिममध्ये व्यायामाला जा. आज व्यायामाने शरीराला शिस्त लावा आणि कालांतराने तुमच्या शरीराला योग्य आकार मापात ठेवायला त्याची मदत होईल.

ग्रीन टी प्या

ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी यथास्थित राखली जाते आणि त्वचेवर चमक येते.

पुरेशी झोप घ्या

उशिरापर्यंत जागरण केल्याने सारी ऊर्जा निघून जाते, त्वचा व केस निस्तेज होतात. हे टाळण्यासाठी रात्री 10 च्या पुढे कधीही जागरण करू नका. पुरेशी झोप घ्या ज्यामुळे शरीराला पूर्णतः स्वस्थ आणि ताजेतवाने वाटेल.

हिरव्या पदार्थांचे सेवन करा

शरीरातील व्हिटॅमिनचे प्रमाण वाढविण्यासाठी हिरव्या भाज्या आणि फळांचे रस प्या. दररोज हिरव्या भाजांपासून बनविलेले सलाड खा.

उच्च प्रथिनेयुक्त न्याहारी करा:

यामुळे तुम्हाला दीर्घकाळ उत्साही, ताजेतवाने वाटत राहील, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यापासून संरक्षण मिळेल. आहारातील ताजी फळे आणि भाज्या, ताजे मांस, शेंगदाणे आणि बियांचे प्रमाण वाढवा यामुळे अधिकाधिक प्रमाणात पोषकद्रव्ये मिळत राहतील.

साखरेचे सेवन बंद करा

आगामी सण आणि मेजवानी गृहीत धरून आत्तापासूनच आहारातील साखरेचे सेवन बंद करून टाका. साखरेमध्ये कसलीही पोषणमुल्ये नसतात आणि तुमच्या यकृताला उपयुक्त ठरेल, असे साखरेत काहीही नसते.

पायांना मलम लावा

उंच टाचेची पादत्राणे, नृत्य, चालणे यामुळे तुमच्या मौल्यवान पायांवर खूप भार पडत असतो. मलम लावल्याने पायांना आवश्‍यक फॅटी एसिड मिळते आणि सारी रात्र डान्स फ्लोअरवर घालवली तरीही पाय मऊ मुलायम राहतात.

स्वतःचे लाड करा

आंघोळीपूर्वी अथवा नुसता शॉवर घेण्याआधी कोरडया ब्रशने अंग साफ करा, ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारेल आणि त्वचा चमकदार दिसू लागेल. सोना किंवा नेहमीच्या स्टीम बाथमध्ये निवांत पडून आराम केल्याने देखील घामाद्वारे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जाऊन शांत, स्वस्थ वाटते.

अन्न व्यवस्थित चावून खा

प्रत्येक घास हळुवारपणे नीट चावून खाल्ल्‌याने पोटात कमीत-कमी वायू शिरतो. अपचन किंवा हातापायात गोळे येणे हे शरीरातील नैसर्गिक द्रव्यांच्या कमतरतेचे लक्षण असू शकते आणि जेवणासोबत पाचक द्रव्याचे सेवन करून त्यावर मात करता येते.

पार्टीच्या मोसमासाठी सज्ज होताना वरील उपयोजना केल्याने तुमची प्रतिकारशक्ती निश्‍चित चांगली राहण्याची वा सुधारण्याची खात्री राहील.

सणासुदीचे दिवस संपले की, नव्या वर्षी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी औषधांचे (डीटॉक्‍स) सेवन करण्याची आपल्यापैकी अनेकांना जणू सवयच लागून गेलेली असते. पण अती खाणे आणि पिणे यामुळे वाटयाला येणा-या विपरित परिणामांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्न करू शकतो, जर आपण पूर्व खबरदारी अर्थात प्रीटॉक्‍स’चा अवलंब केला तर आपले शरीर सुरळीतपणे कार्यरत राहील आणि ख्रिसमस तसेच नवीन वर्षातील पाटर्यांचा पुरेपूर मनमुराद आनंद लुटता येईल.”

पार्टी म्हणजे मद्यसेवन नव्हेच…

देशभरात अनेकजण मद्याने भरलेले ग्लास उंचावून या वीकेण्डचं स्वागत करणार आहेत. सर्वसामान्यपणे आणि दुर्दैवाने म्हणा, पण सुट्टयांची मजा अतिरिक्त मद्यपान करण्याशी जोडली गेली आहे.

सुट्टयांच्या या मोसमातील धावपळ, पळापळ काही वेळा दमवणारीही असू शकते. इतकंच नाही तर डिसेंबर महिना म्हणजे पाटर्याचा महिना. या काळात सतत खाणं-पिणं होत असल्याने ते काहीसं गंभीरही ठरू शकतं. पण, याचे फारसे गंभीर परिणाम होत नाहीत, हा गैरसमज अतिरिक्त मद्यपान करणाऱ्यांनी काढून टाकावा, असा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

काय आहे हॉलिडे हार्ट सिंड्रोम (एचएचएस)?

सुट्टयांच्या आनंदाच्या भरात हृदयाला होणारा त्रास फारसा परिचित नाही. त्याला हॉलिडे हार्ट सिंड्रोम (एचएचएस) असं म्हणतात. मद्यपानाचे परिणाम किती गंभीर असतील, हे प्रामुख्याने मद्यपानाचे प्रमाण आणि त्या-त्या व्यक्तीचा वैद्यकीय भूतकाळ यावर अवलंबून आहे. प्रचंड प्रमाणात इन्टॉक्‍सिकेशन (मद्यपान) झाल्यामुळे उलटया होणे, शुद्ध हरपणे, स्वादूपिंडाचा दाह होणे, असा त्रास होतो आणि काही वेळा मृत्यूही ओढवू शकतो. अर्थात, वारंवार बेधुंदपणे मद्यपान करण्याने आरोग्याच्या इतर गंभीर तक्रारीही उद्भवू शकतात. अनियंत्रित उच्च रक्तदाब, इस्कॅमिक हृदयरोग किंवा हृदय बंद पडण्याचा त्रास असे त्रास असणा-यांसाठी बेधुंद मद्यपान अधिक गंभीर ठरू शकतं. कारण, अतिरिक्त मद्यपानामुळे हे विकार बळावतात. मद्य आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये फारच चटकन आणि परिणामकारकरीत्या शोषलं जातं. रक्तातून ते संपूर्ण शरीरात पसरून बहुतांश ऊती व अवयवांपर्यंत पोहोचते. बरेचसे मद्य यकृतात साठवले जाऊन चरबी, प्रथिनं आणि कबरेदकांप्रमाणेच शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरले जाते. बेधुंद मद्यपानामुळे लयहीनतेचा त्रास होऊ शकतो. म्हणजेच, हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचनाचा वेग, त्यांचा ताल यात प्रचंड प्रमाणात अनियमितता निर्माण होते.

कांचन नायकवडी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)