पार्किंग धोरणाविरोधात आंदोलने

– राष्ट्रवादीची स्वाक्षरी मोहीम


– मनसेने चिटकविले स्टिकर

पुणे:  सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढावा, तसेच वाहतूक सुरळीत व्हावी अशी कारणे देत भाजपने स्थायी समितीमध्ये मंजूर केलेल्या पार्किंग धोरणाविरोधात महापालिकेत बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेने आंदोलने केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या निर्णयाविरोधात महापालिका प्रवेशद्वाराजवळ नगरिकांची स्वाक्षरी मोहीम घेतली. तर मनसेने चक्क महापौर, उपमहापौर आणि भाजप नगरसेवकांच्या वाहनांवर पार्किंग शुल्काचे स्टिकर

..ही तर भ्रष्टाचाराची पॉलिसी : तुपे

पार्किंग धोरणाच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने पालिका भवनाच्या प्रवेशद्वारावर निषेध आंदोलन केले. यावेळी नागरिकांच्या स्वाक्षरींचे निवेदन महापौर आणि आयुक्तांना देण्यात आले. विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, नगरसेवक सुभाष जगताप, महेंद्र पठारे, विशाल तांबे, योगेश ससाणे, नगरसेविका ाहेमलता मगर, दीपाली धुमाळ , राकेश कामठे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तुपे म्हणाले, पुणे महापालिकेतील सताधारी पक्षाकडून सर्व सामान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम पार्किंग धोरणातून करण्यात आले आहे. ही बाब निषेधार्थ आहे. या विषयाला भाजप शहराध्यक्षांचा विरोध आणि मुंबईतून फोन येतो. त्याला मंजुरी मिळते. म्हणजे यातून मोठा आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्‍यता आहे. ही

 

मनसेचे स्टिकर आंदोलन

पार्किंग धोरणाचा निषेध मनसेने बुधवारी “मनसे स्टाईल’ने केला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर, उपमहापौर, तसेच भाजप पदाधिकाऱ्यांच्या वाहनांच्या पुढील काचेवर पार्किंग धोरणाचे स्टिकर चिटकवले. त्यावर “पुणे महापालिका पे ऍन्ड पार्क, वसुली ठेकेदार भाजप, सौजन्य महापालिकेतील सर्व नगरसेवक’ अशी माहिती लिहलेली होती. मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर, माजी नगरसेविका ऍड. रूपाली पाटील, शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सत्ताधारी भाजपकडून पार्किंग धोरणाच्या नावाखाली पुणेकरांवर हा जिझीया कर लावण्यात आला असून तो तातडीने रद्द करावा, अशी मागणी यावेळी मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)