पार्किंगसाठी 300 वृक्षांची कत्तल?

तळजाई टेकडी मैदान: वृक्षप्रेमींनी कामगारांना पिटाळले

पुणे – महापालिकेने तळजाई टेकडी येथे नुकतेच उभारण्यात आलेल्या क्रिकेट मैदानाच्या पार्किंग व्यवस्थेसाठी मैदानाच्या पलिकडील बाजूस असलेली तब्बल 300 वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. यासाठी वृक्षमोजणीस आलेल्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना नगरसेवक सुभाष जगताप यांच्यासह वृक्षप्रेमींनी गुरूवारी पिटाळून लावले. दरम्यान, यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत माहिती देताना जगताप म्हणाले, “महापालिकेने तळजाई टेकडीची जागा न्यायालयात लढा देऊन मिळविली आहे. त्या ठिकाणी न्यायालयाने केवळ आणि केवळ वृक्षारोपणासाठी जागा दिलेली आहे. असे असताना, या भागात बांधलेल्या मैदानासाठी सुमारे अडीच ते तीन एकर जागेत पार्किंग उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाचे नाव पुढे करण्यात आले आहे. सौर ऊर्जा प्रकल्पसाठी “शेड’ उभारून त्याखाली पार्किंग केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी निवडण्यात आलेल्या या जागेत दाट झाडी आहे. त्यात सुमारे 300 झाडांचा समावेश आहे. अशा प्रकारे सौर ऊर्जेचे नाव पुढे करून ही वृक्षतोड केली जात आहे. त्यासाठी गुरूवारी सकाळी ठेकेदाराचे कर्मचारी झाडांची मोजणी करण्यासाठी आले होते. त्यानंतर ही झाडे तोडण्यात येणार होती. मात्र, काही वृक्षप्रेमींकडून ही माहिती मिळताच या ठिकाणी जाऊन तातडीने हे काम थांबविण्यात आले.’

येथील वृक्षमोजणी, तोडीणीसाठी महापालिकेच्या तत्कालिन अतिरिक्‍त आयुक्त शितल उगले यांनी मान्यता नाकारली होती. मात्र, त्यांची बदली होताच महापालिकेच्या भवन विभागाने हा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याकडून मान्य करून घेऊन हे काम सुरू करण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोपही जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. दरम्यान, या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

या भागात कोणतीही वर्दळ नाही. त्यामुळे तळजाई टेकडीच्या रस्त्यावर पार्किंगसाठी मुबलक जागा आहे. ही बाब लक्षात घेता या ठिकाणी स्वतंत्र पार्किंगची काहीच गरज नाही. मात्र, अनावश्‍यकरित्या हा प्रस्ताव आणला जात असून त्यास विरोध केला जाईल.
– सुभाष जगताप, नगरसेवक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)