पार्किंगसाठी पैसे मोजावेच लागणार…

प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र शुल्क : मुख्यसभेच्या मंजुरीची प्रतीक्षा 

पुणे – महापालिका स्थायी समितीने मंगळवारी पार्किंग पॉलिसीचा प्रस्ताव अखेर मंजूर केला. मुख्यसभेनेही या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास त्याच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे.

पार्किंग पॉलिसी मंजूर केली असली, तरी गल्ली बोळांमध्ये पोलिसांनी केलेले पार्किंगचे नियम आणि त्या रस्त्यांची व्यापकता तपासण्यात येणार आहे. सद्यस्थितीत त्या ठिकाणी रात्री आणि दिवसा किती वाहने पार्क करण्यात येतात. याचा तपशीलही काढण्यात येणार असल्याचे, महापालिकेचे वाहतूक नियोजन विभागाचे उपायुक्त श्रीनिवास बोनाला यांनी सांगितले.

शहरातील विविध रस्ते आणि आतील गल्लीबोळ यानुसार 3 झोन करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक गाड्यांसाठी वेगवेगळे शुल्क ठरवण्यात आले आहे. रात्री गाड्या पार्क करायच्या असतील तर त्यांचे ऑनलाइन शुल्कही भरता येणार असल्याचे बोनाला यांनी सांगितले. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेसाठी हे शुल्क असणार आहे.

रात्र निवासी पार्किंगसाठी रात्री 10 ते सकाळी 8 या 10 तासांच्या कालावधीसाठी कारच्या तुलनेने व्यापणाऱ्या जागेसाठी प्रतिदिवशी 10 रुपये असा 3650 रुपये वार्षिक दर लावण्यात येणार आहे. प्रशासनाने हा दर प्रतिदिवशी 50 रुपये सुचवला होता. उपसूचनेद्वारे तो 10 रुपये करण्यात आला आहे.

जुने अविकसित वाडे, जुनी वसाहत, इमारती, समाविष्ट गावातील जुन्या इमारती यासाठी रात्र निवासी पार्किंगसाठी प्रतिदिन पाच रुपये याप्रमाणे वार्षिक भाडे 1825 रुपये आकारण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)