पार्किंगमधून लांबविला नऊ लाखांचा डम्पर

वाकी-बांधकामासाठी लागत असलेल्या मालाची वाहतूक करणारा लाल रंगाचा नऊ लाख रुपये किंमतीचा डम्पर कंपनीच्या पार्किंगमधून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कोणाला कसलाच थांगपत्ता लागू न देता चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोई (ता. खेड) गावच्या हद्दीतील बालेश्वर स्टोन क्रशर कंपनीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या या डम्परच्या चोरीप्रकरणी चाकण पोलिसांनी गुरुवारी (दि. 17) अज्ञात भामट्यांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
वैभव संजय बेंडाले (वय 25, रा. निघोजे, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बेंडाले यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी अज्ञात भामट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बेंडाले यांच्या मालकीचा टाटा कंपनीचा 1613 मॉडेल असलेला लाल रंगाचा डम्पर (एमएच 14 एएस 9298) आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या मालाची वाहतूक करणारा हा डम्पर बाळू मारुती जाधव यांनी मोई गावच्या हद्दीतील बालेश्वर स्टोन क्रशर या कंपनीला सुट्टी असल्याने या कंपनीच्या पार्किंगमध्ये मंगळवारी (दि. 15) दुपारी पार्क केला होता. त्यानंतर जाधव हे घरी निघून गेले. काही कामगारांनी बेंडाले यांना फोन करून सांगितले की, तुमचा लाल रंगाचा डम्पर पार्किंगमध्ये दिसत नाही. त्यावेळी आम्ही दार उघडण्याचा प्रयत्न केला असता दारांना बाहेरून कड्या लावलेल्या होत्या. शेजारील लोकांनी कड्या उघडताच आम्ही बाहेर येवून सबंधित ठिकाणी जावून पाहिले असता डम्पर जागेवर नव्हता. त्यामुळे कोणीतरी अज्ञातांनी या डम्परची दि. 15 मे दुपारी 2 ते दि. 16 मे सकाळी सहा या वेळात चोरी केल्याचे निदर्शनात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)