पार्किंगमधुन 23 हजाराच्या बॅटऱ्या चोरीला

नगर – उपनगरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा 23 हजार रूपयांच्या ट्रकच्या बॅटऱ्या चोरल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील वाहन चालक व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची अधिक माहिती अशी फिर्यादी जमीर अयाज शेख (रा. बेलदार गल्ली घर, नंबर 1120 ,सर्जेपुरा ) यांनी त्यांच्या मालकिची मालट्रक क्रमांक एम एच 17 बीडी 2989 बी ही महेश टॉकिज जवळील सरदार पार्किंगमध्ये लावलेली असतांना मालट्रकच्या केबीनच्या काचा फोडून अज्ञात चोरटयाने सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास 23 हजार रूपये किंमतीच्या दोन बॅटऱ्या ,व्हील व दोन लोखंडी टॉमी चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)