पार्किंगमधील तीन दुचाक्‍या भस्मसात

 

पुणे,दि.30- सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या तीन दुचाक्‍या आग लागून खाक झाल्या. ही घटना कोंढवा खूर्द परिसरात शिवनेरी नगरमध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोंढवा खुर्द परिसरात शिवनेरी नगर गल्ली क्र. 8 मधील सनवर्थ अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पहाटे दोन वाजता वाहनांना आग लागली. यावेळी पल्सर दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाला. याच्या आवाजाने अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना जाग आली. त्यांनी ताबडतोब या प्रकाराची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास दिली. कोंढवा बुद्रुक अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या आगीमध्ये तीन दुचाक्‍या जळून खाक झाल्या. तांडेल सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली संग्राम देशमुख, लोणकर आणि वाहनचालक तडवी आदींनी पाण्याचा मारा करीत आग अटोक्‍यात आणली. त्यामुळे परिसरातील वाहनांना आग लागून होणारे नुकसान टळले.

पार्किंगमधील इलेक्‍ट्रिक मीटर बॉक्‍स जळालेला होता. त्यामुळे इलेक्‍ट्रिक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या आगीमध्ये कोणीही जखमी झाले नाही. आग लागलेल्या पल्सर दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाल्यामुळे पार्किंगच्या छताचा काही भाग पडला होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)