पारा घसरणार, थंडी परतणार

पावसामुळे बदल : हवामान विभागाचा अंदाज

पुणे – राज्यावर गेले दोन ते तीन दिवसापासून असणारे ढग आता दूर झाले असून पुन्हा एकदा थंडीची चाहूल सुरू होण्याची शक्‍यता आहे. येत्या एक ते दोन दिवसांत किमान तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात गेले दोन दिवस पाऊस झाला नाही. तसेच तापमानात ही घट होत आहे.

नोव्हेंबरच्या सुरूवातील राज्यात थंडीची चाहूल लागली होती, पण अचानक वातावरण बदलेले आणि राज्यात पावसाळी हवामान झाले. ऐन दिवाळीच्या तोंडावर व दिवाळीच्या पहिल्या दिवशी पाऊस झाला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात तर विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. पुण्यातही सलग पाच दिवस पावसाने हजेरी लावली. त्यामुळे थंडी गायब झाली होती. तर कमाल तापमानही वाढले.

कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात असलेल्या चक्राकार स्थितीमुळे हा पाऊस पडला होता. त्याचबरोबर वाऱ्यांची स्थिती तशीच होती. त्यामुळे पावसाने हजेरी लावली, पण आता ही स्थिती मध्यप्रदेशकडे सरकली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा कोरडे हवामान सुरू होणार आहे. यामुळे किमान तापमानात घट होऊन थंडी वाढण्याच्या शक्‍यता आहे. त्याचबरोबर कमाल तापमानातही घट होणार आहे.पुन्हा थंडी सुरु होईल. पुण्यातही बुधवारी किमान तापमानाचा पारा 20 अंश सेल्सियस होता. त्यात येत्या दोन ते तीन दिवसांत घट होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)