पारनेर शहराचा पाणीप्रश्‍न श्रेयवादामुळे चिघळणार?

लोकप्रतिनिधींचा श्रेयवादासाठी केविलवाणा प्रयत्न; सत्ताधाऱ्यांनी केला आरोप

पारनेर – शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा, यासाठी नगराध्यक्ष वर्षा नगरे व उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे व नगरसेवक यांनी सर्वोतपरी प्रशासकिय प्रयत्न करुन सुपा औद्योगिक वसाहतीकडुन पाणी मिळवण्यासाठी कागदपत्रांचा पाठपुरावा केला व तसे प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना अखेर यश येवून औद्योगिक वसाहतीकडुन पारनेर शहराला दररोज पाच लाख लीटर पाणी देण्याचे एमआयडीसीला पत्र आले, त्यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांच्या विशेष प्रयत्न केले. मात्र पारनेरचे लोकप्रतिनिधी बालिशपणा करीत, श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची खरमरित टिका नगराध्यक्ष नगरे व चेडे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी पत्रकार परिषेदेला नगरसेवक नंदकुमार औटी, विशाल शिंदे, अर्जुन भालेकर, बापू शिंदे नगरसेविका विजाता सोबले, शशिकला शेरकर आदी उपस्थित होते.

नगरपंचायतीने प्रसिध्दीस दिलेले निवेदनात म्हटले आहे, पारनेर सुपा औद्योगिक विकास महामंडळाकडुन पाणी पुरवठा व्हावा, या साठी 27 ऑक्‍टोबरला संबंधीत अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी देवेद्रसिंग परदेशी यांनी शासकीय यंत्रणेचा पाठपुरावा केला होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालक मंत्री राम शिंदे, प्रशासकीय अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांच्याकडे या प्रश्‍नाबाबत नगराध्यक्ष वर्षा नगरे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे व नगर पंचायतील सत्ताधारी नगरसेवकांनी या प्रश्‍नासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या सर्व कागदपत्रांचा पुरावा त्यांनी पत्रकारांसमोर मांडला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

12 डिसेंबरला या नगरसेवकांनी पारनेर तहसील कार्यालयाच्या दालनात आंदोलन केले होते. आपल्या पदाचा दुरूपयोग करीत, प्रशासकीय यंत्रणा वेठीस धरून आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणुन, तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत होते असा आरोप यावेळी करण्यात आला. चेडे व नगरे यांच्या प्रयत्नांना यश मिळणार हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर नामदारपुत्र हे अध्यक्ष-उपाध्यक्षांना भेटून श्रेयवादासाठी तुम्ही साहेबांकडे या, असा हट्ट धरला होता असा आरोप उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी केला आहे.

आम्ही पारनेर शहराला पाणी मिळण्यासाठी मोर्चे केले, शासनदरबारी पाठपुरावा केला, त्यावेळेस स्थानिक लोकप्रतिनिधी कुठे होते? शहरातील नागरिक सुज्ञ आहेत, त्यांना माहित आहे, पारनेरला एमआयडीसीचे पाणी कोणी आणले.
वर्षा नगरे
नगराध्यक्ष, नगरपंचायत पारनेर

पाण्यासाठी गेले दोन महिन्यापासून पाठपुरावा करीत होतो. पण वेळोवेळी अधिकाऱ्यांवर स्थानिक लोकप्रतिनिधींचा दबाव येत. लोकप्रतिनिधींना आम्ही करीत असलेल्या कामात सहकार्य करता येत नसल्यास हस्तक्षेप करू नये.
चंद्रकांत चेडे
उपनगराध्यक्ष, नगरपंचायत पारनेर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)