पारनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे

सुपा- पारनेर तालुका दूध संघाच्या अध्यक्षपदी रांजणगावचे उपसरपंच राहुल शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी संतोष गांगड यांची बिनविरोध निवड झाली.
गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला तालुका दूध संघ ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी जोरदार हालचालींना वेग आला आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष दादासाहेब पठारे यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करण्यात आली.

दादासाहेब पठारे म्हणाले, “”संघाचे दूध संकलन गेल्या 8 वर्षांपासून बंद होते. यामुळे कामगारांचे पगार थकले आहेत. त्यासाठी नगर जिल्हा दूध संघाच्या जागेची विक्री करण्यात आली. त्या जागेमधील पारनेर दूध संघाच्या वाट्याला येणाऱ्या रकमेतून कामगारांचे देणे देण्याचे ठरले. सुपा येथील संघाच्या जागेवर व्यापारी संकुल उभारले जाणार आहे.”
बंद असलेला दूध संघ लवकरच सुरू करण्यात येणार आहे. दुधाचे संकलन सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष शिंदे, उपाध्यक्ष गांगड यांनी सांगितले. जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रामचंद्र मांडगे, गुलाबराव डेरे, वसंत सालके, दादासाहेब वारे, संदीप ठुबे, ज्ञानदेव गट, किसन गवळी, विनायक पवार, अविनाश खंदारे, शिवाजी औटी, विजय रणसिंग, ज्ञानदेव रावडे, पी. एच. मांडगे, डी. वाय. शिंदे, रावसाहेब गायकवाड, भास्कर थोरात यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)