पारनेरमध्ये एकाकडून दोन गावठी कट्टे जप्त

पारनेर – तालुक्‍यातील कोहकडी फाटा येथेमोटारसायकलची धडक देऊन पळण्याच्या तयारीत असलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे दोन गावठी कट्टेव चार जिवंत काडतूस सापडले. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.

प्रताप मंजाबा साळुंके (वय 53, रा. गुणोरे, पारनेर ) असेत्याचेनाव आहे. कोहकडी फाटा येथे शुक्रवारी रात्री प्रताप यानेरतीराम बाबुराव ढेरंगे यांना मोटारसायकलची धडक दिली. यावेळी साळुंकेहाही दुचाकीवरून पडला. त्याला परिसरातील ग्रामस्थांनी पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला परंतुअंधाराचा फायदा घेऊन तोपळाला.

ग्रामस्थांनी पोलिसांना ही माहिती पारनेरचेपोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, हवालदार अशोक निकम, शिवाजी कावडे, अरविंद भिंगारदिवे, महेश आव्हाड , भालचंद्र दिवटे यांच्या पथकानेसाळुंकेला पाठलाग करत पकडले.
त्याची झडती घेतली असता एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस मिळून आले. त्याची अधिक चौकशी केली असता त्यानेएक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस अपघातस्थळीच फेकून दिल्याचेकबूल करताच ते कट्टे आणि काडतुसेपोलिसांनी हस्तगत केली. दरम्यान अपघातात जखमी झालेले ढेरंगे यांचे उपचारादरम्यान निधन झाले.साळुंके याने दोन गावठी कट्टे आणि काडतूस कोठून आणले याची माहिती पोलीस घेत आहेत. त्याच्याकडून आणखी गुन्हेउघड होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)