पारदर्शी कारभाराच्या गप्पा मारणाऱ्यांनीच गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवली- नवाब मलिक

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई: निवडणुकांदरम्यान उमेदवाराला त्यांची शैक्षणिक योग्यता, संपत्तीची माहिती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देणे कायद्याने बंधनकारक असते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरील दोन खटल्यांची माहिती लपवली आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. प्रतिज्ञापत्रावर खोटी माहिती देणे हा कायद्याने गुन्हा आहे. मुख्यमंत्री एकीकडे पारदर्शी कारभाराच्या गप्पा मारतात आणि दुसरीकडे स्वतःची गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवतात, याने स्पष्ट होते मुख्यमंत्र्यांचा कारभार कशा पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाने नोटिस बजावली आहे. यासंदर्भात त्यांची बाजू मांडण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. मलिक पुढे म्हणाले की, आम्हाला आशा आहे की, सुप्रिम कोर्ट मुख्यमंत्र्यांची निवडच रद्द करेल. मात्र या प्रकरणामुळे मुख्यमंत्र्यांचा पारदर्शी सरकारचा बुरखा टराटरा फाटला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)