पारदर्शक मतदान प्रक्रियेसाठी जनजागृती महत्वाची

वाई ः किसनवीर महाविद्यालयात ईव्हीएम मशिनचे प्रात्यक्षिक दाखवताना प्रांत संगीता चौगुले.

प्रांत संगीता चौगुले : विद्यार्थ्यांना इव्हीएम मशिनचे प्रात्यक्षिक
वाई, दि. 31 (प्रतिनिधी) – आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशान्वये इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनबाबत जनजागृती मोहिम प्रत्येक बुथवर जावून करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर किसनवीर महाविद्यालयात जाऊन प्रांत, तहसीलदार यांनी विद्यार्थ्यांना इव्हीएम मशिनचे प्रात्यक्षिक करून दाखविले व इव्हीएम मशिनव्दारा केलेले मतदान किती पारदर्शक आहे हे प्रत्यक्ष दाखविण्याचा प्रयत्न केला.
या मोहिमेअंतर्गत तालुक्‍यातील सर्व गावातील मतदान केंद्रावर व सर्व महाविद्यालयात जाऊन मशिनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक गाव व मतदान केंद्रांचा आराखडा तयार करण्यात आला असून 1 फेब्रुवारीपर्यंत दोन पथकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे. मतदाराला मतदान करताना त्याचे मत त्याच्या पसंतीच्या उमेदवारालाच गेल्याची खात्री करून घेता येणार असल्याचेही यावेळी संगीता चौगुले यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार रमेश शेंडगे, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले, प्रा. करडे व विद्यार्थी, तहसील विभागाचे कर्मचारी, मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)