पारदर्शक आणि काटकसरीने कारभार करू- नागवडे

बापूंच्या विचारावर वाटचाल करू; नागवडे कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदिपन
श्रीगोंदा – बापूंनी हयातभर शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे कार्य केले. सहकारी कारखानदारीत पारदर्शक आणि काटकसरीच्या कारभारासाठी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नागवडे कारखान्याचे नाव घेतले जाते. गेली पाच दशके बापूंनी आदर्शरित्या कारखान्याचे नेतृत्व केले. येत्या काळात बापूंच्या पद्धतीने आणि आदर्श विचारांवर कारखान्याचा पारदर्शकपणे आणि काटकसरीनेच कारभार करू, अशी ग्वाही “नागवडे’ साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.
नागवडे कारखान्याच्या गळीत हंगामाचा 45 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ शुक्रवारी झाला. कारखान्याचे संस्थापक स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या निधनानंतर कारखान्याचा पहिलाच समारंभ होता. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना नागवडे म्हणाले, तालुक्‍यात पाण्याचे दुर्भिक्ष असताना बापूंनी खासगी कारखान्याचे सहकारी कारखान्यात रूपांतर केले. सदैव शेतकरी हिताचा विचार मांडला. बापूंची शिकवण आदर्श मानून कारखान्याचा कारभार यशस्वीपणे चालविण्यासाठी आम्ही बांधील आहोत.यावर्षी कार्यक्षेत्रात ऊसाची कमतरता भासणार आहे. येत्या काळात सहकारी कारखानदारी टिकविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. चालू हंगामात कारखान्यात प्रतिदिन 6 हजार मेट्रिक टन ऊस गाळप होण्याची अपेक्षा आहे. तोडवाहतुकीच्या खर्चाचा एफआरपीवर होण्याची शक्‍यता नागवडे यांनी यावेळी व्यक्त केली.
नागवडे म्हणाले, ऊसाचे अतिरिक्‍त उत्पादन झाल्यानंतर सगळ्यांचा ऊस आणण्याचे काम नागवडे कारखान्याने नेहमीच केले आहे. यावर्षी ऊसाची कमतरता भासणार असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नागवडे कारखान्याला ऊस देण्याचे आवाहन नागवडे यांनी करीत सर्वांच्या बरोबरीने बाजारभाव देण्याचे आश्वासन दिले.
ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस म्हणाले,स्व.बापूंनी कायमस्वरूपी सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम केले. हजारो लोकांचे प्रपंच उभे करणाऱ्या कारखानदारीत राजकारण होऊ नये. नागवडे कारखान्याला कोणतीही अडचण आल्यास नागवडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. स्व. बापूंची सहकारातील स्वप्नं पूर्ण करण्यासाठी सर्वांनी साथ देण्याचे आवाहन भोस यांनी केले. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार म्हणाले, स्व. बापूंच्या निधनाने सहकारी कारखानदारीची अपरिमित हानी झाली आहे. बापू सर्वांचे संकटमोचक होते. बापूंचा वारसा घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन वाटचाल करावी लागणार आहे. अडचणीच्या काळात कमी असल्याने सर्वांनी नागवडे कारखान्याला ऊस देण्याची विनंती शेलार यांनी यावेळी केली. घोड व कुकडीच्या आवर्तनाचे सुयोग्य नियोजन होणे देखील महत्वाचे आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, केशव मगर, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, जिजाबापू शिंदे, राजू गोरे, राजकुमार पाटील, अरुण पाचपुते, सुनील भोस, सुभाष शिंदे, अनिल पाचपुते, सुरेखा लकडे, अंजली रोडे, लताबाई पाचपुते, विलास काकडे आदी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)