पारगाव शिंगवे गावामध्ये शुकशुकाट

पारगाव शिंगवे- मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदमुळे आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव शिंगवे गावामध्ये शुकशुकाट होता. पारगाव, वळती, रांजणी, लाखणगाव, अवसरी, मेंगडेवाडी, लोणी, धामणी आदी गावांमधील व्यवसायिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. पारगावची संपूर्ण बाजारपेठ बंद होती. तसेच माध्यमिक शाळा व महाविद्यालय देखील बंद होती. खाजगी वाहतूकही बंद होती.
लोणी धामणी गावातील दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली. सर्व शाळा आणि शासकीय कार्यालये देखील बंद होती. सकाळी गावातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी रवींद्र करंजखेले, सागर जाधव, नितीन जाधव, मिलिंद जाधव, दिपक जाधव, बाळशीराम थिटे, सुभाष जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)