पारगाव शिंगवेच्या सरपंच, उपसरपंचावर गुन्हा दाखल

अपंगाच्या टपरीवर कारवाई

मंचर- पारगाव-शिंगवे (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी अपंगाच्या व्यावसायीक टपरीचे नुकसान व मोडतोड केल्याप्रकरणी तसेच शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पाच सदस्य आणि इतर तीन अशा एकुण दहा जणांवर मंचर पोलीस ठाण्यात अपंग संरक्षण कायदा 2016 नुसार कलम 92 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
25 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी सुमारे दोन वाजता सरपंच बबन नामदेव ढोबळे, उपसरपंच सुनंदा निवृत्ती ढोबळे, सदस्या शोभा अशोक लबडे, सुवर्णा संदीप ढोबळे, छाया संदीप बढेकर, दिलीप शंकर लोखंडे, किरण किसन ढोबळे, ग्रामस्थ संदीप कचरदास बढेकर, निवृत्ती पांडुरंग ढोबळे, कल्याण देवराम ढोबळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची परवानगी न घेता इतर मोजणी करुन सिध्द झालेल्या अतिक्रमणधारकांना पाठीशी घालून अपंग हित विकास आणि पुर्नवसन संघाचे संस्थापक दीपक ढोबळे यांच्या टपरीवर कारवाई केली. तसेच टपरीचे नुकसान केले होते. त्यामुळे सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने संबंधित टपरी अतिक्रमणामध्ये आहे की नाही याबाबत मोजणी करुन सिध्द केले नाही. फक्त दीपक ढोबळे यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी कारवाई केली आहे. माझे खच्चीकरण करुन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद ढोबळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 10) दिली आहे. याप्रकरणाचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)