पारगाव-शिंगवेची निवडणूक प्रतिष्ठेची

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील राजकीयदृष्टया महत्त्वाच्या असणाऱ्या पारगाव-शिंगवे येथील ग्रामपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे. सरपंचपदासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शैलेजा ढोबळे आणि भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक तथा शिवसेनेचे नेते शिवाजी ढोबळे यांचा मुलगा ऋषीकेश ढोबळे तर राष्ट्रवादीच्यावतीने बबनराव ढोबळे आणि इतर दोन अपक्ष उमेदवार अनुक्रमे दीपक ढोबळे, भाऊसाहेब ढोबळे उभे राहिल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे. एकूण जागा पंधरा जागा असलेल्या ग्रामपंचायतच्या तीन जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 12 जागांसाठी निवडणूक होत आहे.
वार्ड 1 : काळुराम लोंखंडे, दिलीप लोखंडे, आशा ढोबळे, राजश्री ढोबळे, सुनंदा ढोबळे, कविता दातखिळे. वार्ड 2 : छाया बढेकर, सारीका लोखंडे, सुवर्णा ढोबळे, संध्या ढोबळे, किरण ढोबळे, निलेश ढोबळे. वाड 3 : महेश देवडे, सचिन देवडे, शितल ढोबळे, सुनिता ढोबळे, किरण ढोबळे, सुनिल ढोबळे. वार्ड 5 : भाग्यश्री कोल्हे, अंजना वाव्हळ, शोभा लबडे, सविता ढोबळे, शिवाजी पोंदे, दत्तात्रय वैद्य यांच्यामध्ये लढत आहे. तर वार्ड 4 मध्ये विठ्ठल ढोबळे, सचिन अस्वारे, पुष्पा चांगण यांची बिनविरोध निवड झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)