पारगाव येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्‌घाटन

पारगाव शिंगवे- आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव येथील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्‌घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखाचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, प्राचार्य डॉ. एस. जी. शिंदे, भीमाशंकर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, भीमाशंकर शिक्षण संस्थेचे बी. डी. चव्हाण, प्राचार्य अशोक शिंदे, एस. सी. कदम आदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब बेंडे म्हणाले की, कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून वेगवेगळ्या नोकरीच्या संधी हस्तगत केल्या आहेत. शेती व्यवसायाची अवस्था वाईट असल्याने शेतकरी कुटुंबातील सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करून स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळविले पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. जी. कोरडे यांनी केले तर जी. एस. इनामदार यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)