पारगाव येथील महिलांना ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण

मंचर ः दत्तात्रयनगर-पारगांव येथील भीमाशंकर कारखान्याच्या वतीने मांजरी येथील वसंतदादा ऊस संशोधन केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी 36 महिला शेतकऱ्यांना “ज्ञानलक्ष्मी’ प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेडे यांनी दिली.
दिवसोंदिवस ऊस शेतीमध्ये महिलांचे वाढते योगदान लक्षात घेता महिला ऊस उत्पादक, सभासद शेतकऱ्यांना ऊस लागवडीचे नवीन तंत्रज्ञान, ऊस लागवड पद्धत, ऊस जाती, खत आणि पाणी व्यवस्थापन, रोग-किडींची माहिती होणे गरजेचे असल्याने वसंतदादा ऊस संशोधन केंद्र मांजरी बुद्रुकमार्फत महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे ऊस उत्पादक महिला शेतकऱ्यांसाठी दरवर्षी ऊस शेती “ज्ञानलक्ष्मी’ प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार प्रशिक्षण कार्यक्रमासाठी भीमाशंकर कारखान्यामार्फत 36 महिलांना पाठविण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.कारखान्यामार्फत प्रतिप्रशिक्षणार्थी प्रवेश शुल्क, प्रवास आणि इतर सुविधा मोफत देण्यात येते. जास्तीत जास्त महिला शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभागी होऊन ऊस शेतीचे महत्त्व आणि तंत्रज्ञान समजून घेऊन मिळालेल्या माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून आपले एकरी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी केले आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालक बाबासाहेब खालकर, माउली अस्वारे, तसेच ऊस विकास अधिकारी संदीप मोरडे, सहाय्यक ऊस विकास अधिकारी दिनकर आदक आणि ऊस उत्पादक अशोक मेंगडे, विकास वाळुंज, अशोक गावडे, रवींद्र खांडगे तसेच शेतकी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने महिला शेतकऱ्यांस प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)