पारगाव पुलाशेजारी भरदिवसा खुलेआम वाळूउपसा

मांडवगण फराटा – शिरूर तालुक्‍याला भीमा नदीची मोठ्या प्रमाणात किनारपट्टी लाभली आहे. या परिसरातील गावांना या नदीमुळे मुबलक बारमाही पाणी उपलब्ध असते. या नदी काठावरील गावातील वाळूचोरांनी दिवस-रात्रं वाळू काढून नदी पात्रात मोठं-मोठे खड्डे पाडले आहेत. जून-जुलै महिन्यामध्ये बंधाऱ्याच्या पाणी अडविणाऱ्या प्लेटा काढल्या जातात.

परंतु यावर्षी योग्य पाऊस ग्रामीण भागात न पडल्यानं तसेच धरण क्षेत्रात पाऊस पडून धरणे भरून राहिल्याने पाणी नदी पात्रातून उजनी धरणात सोडण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊसाची सरी न पडल्याने नदी पात्रातील पाणीपातळी कमी होऊन नदी पात्र मोकळे, रिकामे पडले आहे. त्यामुळे नदी पत्रातील वाळू उघडी पडली आहे. याच वाळूवर वाळू चोरांनी भरदिवसा कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता वाळू उपसा मोठ्या प्रमाणात चालू केलेला आहे. पारगाव (ता. दौंड) येथील बंधाऱ्याच्या जवळील भागात दिवस-रात्र वाळू उपसा चालू असल्याने भविष्यात हा बंधारा पडतो की काय? अशी भिती निर्माण झालेली आहे.

वाळू उपसा हा शिरूर-सातारा मुख्य रस्त्यावरुन महसूल विभागाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. सर्व सामान्य माणसाला वाळू उपसा दिसतो. परंतु महसूल विभागाच्या अधिकारी वर्गास का दिसत नाही? या भागात वाळू ही यारीच्या सहाय्याने काढली जात आहे. सुरक्षित वाळूचा माल हा अन्य ठिकाणी पोहचवला जातो. त्यामुळे येथील बंधाऱ्याच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. वाळू चोरांची या भागात भागात दहशत असल्याचे नागरिक दबक्‍या आवाजात कुजबुज करत असतात.

लिलाव झाला नसताना चाललेल्या वाळूचोरीला कोणाचे पाठबळ आहे?असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. तसेच यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून याला सर्वस्वी महसूल अधिकारी जबाबदार आहे.वाळूचोरीमध्ये प्रामुख्याने स्थानिकांचा सहभाग असल्याचे ग्रामस्थांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)