पारगाव परिसरात बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठा

पारगाव शिंगवे-आंबेगाव तालुक्‍यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व बालगणेश उत्सव मंडळ तसेच घरगुती गणेश भक्तांनी वाजत गाजत आणि ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणेशाची धार्मिक पद्धतीने विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणरायाच्या आगमनाने गणेशभक्त आणि बालगणेश भक्तांचे चेहरे आनंदाने फुलेले होते. अवघा परिसर भक्तीरसात न्हाऊन निघत होता.

तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी, पिंपळगाव, चांडोली, निरगुडसर, रांजणी, वळती, पारगाव, शिंगवे, जवळे, लाखणगाव, लोणी, धामणी, वडगावपीर आदी परिसरातील गावांमध्ये घरगुती गणेश भक्तांनी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास गणरायाची विधीवत प्राणप्रतिष्ठा केली. घरामध्ये गणरायाच्या आगमनामुळे लहान मुलांचे चेहरे आनंदाने फुलेले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ढोल-ताशाच्या गजरात दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास गणरायाची प्राणप्रतिष्ठेस सुरुवात केली. काही सार्वजनिक गणेश मंडळांनी 5 वाजण्याच्या सुमारास धार्मिक पद्धतीने गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक देखावे व विद्युत रोषणाई सादर केली आहे. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. करमणुकीच्या कार्यक्रमाबरोबर मुलांच्या कला गुणांना वाव मिळवा, यासाठी विविध स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धा आदी कार्यक्रम आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)