पारगाव तर्फे खेड शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा

मंचर- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव तर्फे खेड (ता. आंबेगाव) येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केल्या. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना उद्योजक रमेश सावंत, सुधाकर पवळे, वसंत मनकर यांनी बक्षिसे दिली.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सचिन पानसरे यांच्यासह ग्रामस्थांनी केले. या कार्यक्रमाचे मुख्याध्यापक विजय घिसे, मनोज कडधेकर, संतोष पोखरकर, सुमेधा चासकर, स्मिता तळेकर, वंदना चासकर, शैला खेडकर, शुभांगी पंचरास, कविता मनकर, ज्योती आचार्य यांनी नियोजन केले. तसेच संदीप मनकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. भैरवनाथ प्रि. प्रा. स्कूल, जिल्हा परिषद शाळा पारगाव व माळीमळा येथील 132 स्पर्धकांनी शिवाजी महाराज, संभाजी राजे, जिजामाता, सावित्रीबाई, रमाबाई, महात्मा गांधी, सिंधुताई सपकाळ, हंबीरराव मोहिते, वृक्षसंवर्धन, वारकरी, मावळे, भाजीवाले, पंडीत नेहरु, संत ज्ञानेश्‍वर, अहिल्याबाई होळकर, शेतकरी, कुंभार, शिंपी अशा विविध वेशभूषा परिधान केल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)