पारगावात संत सेनामहाराज पुण्यतिथी

मंचर -आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील पारगाव-शिंगवे येथे श्री संत सेनामहाराज पुण्यतिथी सोहळा झाला. यावेळी हभप किशोर महाराज कोकाटे यांचे कीर्तन झाले.
संत सेनामहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिषेक करण्यात आला. श्रींच्या प्रतिमेची मिरवणूक त्यानंतर हभप किशोर महाराज कोकाटे यांचे कीर्तन झाले. उद्योजक गोविंदशेठ खिलारी यांनी श्री संत सेनामहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक दौलत लोखंडे, रामचंद्र ढोबळे, कार्यक्रमाची व्यवस्था रत्नाकर कोऱ्हाळे, गणपत क्षीरसागर, दत्तुअण्णा देवडे, सचिन देवडे, बबनराव शिंदे, दत्ता जाधव यांनी केली. तसेच कार्यक्रमप्रसंगी आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्‍यातील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)