पारगाव शिंगवे-आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी तीन ठिकाणी दुकानांची शटर उचकाटून 6 हजार रुपयांची रोख रक्कम व कागदपत्रे लंपास केली. पारगाव गावातील नानासाहेब ढोबळे यांच्या ऋषी कृषी सेवा केंद्रातील दुकानाचे लोखंडी शटर उचकाटून चोरट्याने दुकानाच्या आत प्रवेश करून दुकानातील 4 हजार रुपये रोख रक्कम आणि शेजारील डॉ. शिवाजी थिटे यांच्या शिवसाई मेडिकलचे शटर उचकटून दुकानातील वस्तू लंपास केल्या. तसेच रस्त्याच्या समोरील योगेश बढेकर यांच्या सर्वज्ञ मेडिकल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील दीड हजार रुपयांची रोख रक्कम व एटीएम कार्ड मतदान कार्ड काही कागदपत्रे चोरट्याने चोरून नेली. अज्ञात चोरटा दुकातील चोरी करताना सीसीटीव्हीत दिसत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0