पारगावात भीमा नदीतीरावरून 20 विद्युत मोटारींची चोरी

यवत-दौंड तालुक्‍यातील पारगाव गावच्या हद्दीतून भीमा नदीच्या तीरावर असलेल्या शेतकरी वर्गाच्या पाणी उपसा करणाऱ्या जवळपास 20 विद्युत मोटारी चोरांच्या टोळीने चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि. 12) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. एका रात्रीत एवढ्या मोठ्या संख्येने विद्युत मोटारी चोरीला गेल्याने शेतकरी वर्गात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या चोरीप्रकरणी सयाजी नारायण ताकवणे (वय 65, रा. पारगाव, ता. दौंड) यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सयाजी ताकवणे यांच्याबरोबर धैर्यशील शिवाजी बोत्रे, मारुती लक्ष्मण डोईफोडे, छबुबाई चंद्रकांत म्हस्के, रामदास गोविंद ताकवणे, चंद्रकांत महादेव बोत्रे, बबन नागुजी डोंबाळे, सुवर्णा दत्तात्रय शितोळे, प्रभाकर ताकवणे, आत्माराम ताकवणे, विठ्ठल सोमनाथ ताकवणे, दीपक प्रभाकर शिशुपाल, संपत श्रीरंग ताकवणे, कुंडलिक धनाजी शिशुपाल, ज्ञानदेव किसन पवार, वसंत विष्णू ताकवणे, निवृत्ती वसंत ताकवणे, महादेव सोपाना खेडेकर, रफिक रमजान सय्यद या शेतकऱ्यांच्या अज्ञात चोरांच्या टोळीने विद्युत मोटारी चोरून नेल्या आहेत. भीमा नदीच्या तीरावर शेतकरी वर्गाच्या शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या हजारोंच्या संख्येने विद्युत मोटारी आहेत. एका रात्रीत एवढ्या मोठ्या संख्येने विद्युत मोटारी चोरीला गेल्याने शेतकरी वर्गात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मोटारी चोरी करणाऱ्या चोरांच्या टोळीचा छडा लावून लवकरात लवकर अटक करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. यवत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)